बरेच दिवसापासुन मणतुर्गा गावच्या गावठाण रस्त्याची आडचण होती.… लोकांना रस्ता हवा होता तसेच शेतकऱ्यांची पण थोडी अडचण किंवा तक्रात होती. यासाठी रस्ता पण व्हावा व शेतकऱ्यांची अडचण पण मिटावी. अशी भूमिका ब्लॉक कॉंग्रेस ने घेतली , याबाबत तहसिलदाराना भेटून वस्तुस्थिती सांगितली होती,सर्वे विभागासोबत पण आम्ही चर्चा केली होती.
यावर खानापूर तहसिलदार दुंडापा कोमार यांनी सोमवारी सर्वांना नोटीस जारी केली .


यावेळी सर्वाशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला. बॉंड पेपरवर सह्या सुध्दा घेण्यात आल्या.

शेतकर्याच्या म्हणण्याप्रमाणे
रस्ता शेताच्या मधोमध न करता शेताच्या एका बाजुने रस्ता करावा.
तसेच सीडी संदर्भात त्यांची तक्रार होती. लगेच तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी व ग्राम पंचायत पीडीओ शी चर्चा करून पुढील वर्षात नवीन सीडी व गावाकडील रस्ता मंजूर करण्यास सांगितले.
यावेळी शेतकरी म्हणाले की आमच्या शेतीचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने करा. अशी मागणी केली.अशा पध्दतीने मणतुर्गा गावच्या गावठाण रस्त्याचा मार्ग मोकळा झाला.
यावेळी अमृत शेलार , ईश्वर बोबाटे, तसेच सुभाष पाटील,ज्ञानेश्वर पाटील,भुजंग पाटील,विठ्ठल उर्फ बा़ळू पाटील,
तसेच कॉंग्रेस चे सुरेश भाऊ, माजी नगरसेवक तोहीद , साईश सुतार , भूषण पाटील, अभिषेक शहापूरकर, यशवंत देसाई कारलगा, तसेच ग्रामस्थ मंड़ळी उपस्थित होती.


Recent Comments