बेळगावमध्ये कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांविरुद्ध करवेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.


या आंदोलनादरम्यान ‘करवे’च्या कार्यकर्त्यांनी समिती आणि मराठी भाषिकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना आरटीओ सर्कलमध्ये रोखले. यावेळी पोलीस आणि ‘करवे’ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर एसी श्रवणकुमार नायक यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.

‘करवे’चे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी समिती आणि शिवसेनेवर बंदी घालण्याची दर्पोक्ती करत मराठी भाषिकांवर गुंडा कायदा लावून त्यांना तडीपार करावे अशी मागणी करून पोलीस आणि प्रशासनाला वेठीला धरण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनामुळे बेळगाव शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


Recent Comments