Belagavi

शिवतीर्थ कॉलनीमध्ये विकासकामांचा शुभारंभ

Share

बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील महांतेश नगर येथील शिवतीर्थ कॉलनीमध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना आमदार आसिफ सेठ यांनी अधिकृतपणे चालना दिली आहे.

महांतेश नगरच्या शिवतीर्थ कॉलनीतील विकासकामांबाबत बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की, “या भागात रस्ते, गटारी आणि विजेची मोठी मागणी होती. आधीच ७५ लाख रुपये खर्चून रस्त्याचा पाया तयार करण्यात आला असून, आता ४६ लाख रुपये खर्चून रस्ता निर्माण केला जात आहे. यानंतर गटारी आणि अतिरिक्त विजेचे खांब बसवून दिले जातील.” असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, २० जून उजाडला तरी अद्याप पाऊस न पडल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि लवकरात लवकर पाऊस पडू दे यासाठी प्रार्थना करावी, अशी विनंती त्यांनी केली.

याप्रसंगी युवक काँग्रेसचे नेते अमान सेठ, कंत्राटदार, स्थानिक नागरिक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Tags: