Belagavi

उत्तम पर्जन्यवृष्टीसाठी भाविकांचे रेणुकादेवीला सामूहिक गाऱ्हाणे

Share

बेळगाव येथील ओल्ड पी.बी. रोडवरील श्री रेणुकादेवी माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक ‘काकणभरणी’ उत्सव अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

या पारंपरिक सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या देवीची ओटी भरणे आणि पारंपरिक पद्धतीने ‘परडी भरणे’ हा विधी अत्यंत श्रद्धेने पार पडला. दुपारी अक्षतारोपण संपन्न झाल्यानंतर मुख्य देवकार्याला सुरुवात झाली. या मंगलप्रसंगी बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर प्रीती कामकर यांनी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले आणि पूजा अर्चा केली.

यंदा मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे बेळगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर, आगामी काळात उत्तम पर्जन्यवृष्टीसाठी देवस्थान समिती आणि भाविकांच्या वतीने रेणुकादेवी चरणी विशेष साकडे घालण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

महाआरतीनंतर या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली, यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Tags: