विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील घोणसगी तांडा येथे शनिवारी सकाळी आकाशात सूर्याभोवती दुर्मिळ ‘सूर्यवलय’ अर्थात सन हॅलो पाहायला मिळाले. हा अद्भूत निसर्ग चमत्कार पाहण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

घोणसगी तांडा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास आकाशात सूर्याभोवती एक सुंदर चक्राकार कडे दिसले. हा अद्भूत प्रकार पाहून थक्क झालेल्या मुलांनी तातडीने शिक्षकांकडे विचारणा केली.

वातावरणातील बर्फाच्या अतिसूक्ष्म कणांवर सूर्यप्रकाश पडल्याने त्याचे वक्रीभवन होते, असे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट केले. ही माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या या वैज्ञानिक किमयाचे फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपून आनंद साजरा केला.


Recent Comments