बेळगाव शहरातील वैभव नगर परिसरात अमली पदार्थाचे सेवन करून संशयास्पद वर्तन करणाऱ्या एका तरूणाला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.

वैभव नगर येथे संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या जनता प्लॉट येथील रहिवासी तनवीर कासीम सय्यद या बावीस वर्षीय तरुणाला एपीएमसी पोलीस ठाण्याचे एएसआय ए. पी. अरकट्टी आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, त्याने गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्याविरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस पथकाच्या या कामगिरीचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.



Recent Comments