Khanapur

खानापूरमधील डोंगरगावात रानटी टस्करांचा धुमाकूळ

Share

खानापूर तालुक्यातील डोंगरगाव परिसरात पाच रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर माहिती मिळताच खानापूरचे माजी आमदार आणि बीडीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी वन अधिकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

डोंगरगाव परिसरात रानटी हत्ती आल्याचे समजताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी भीमगड वन्यजीव अभयारण्याचे आरएफओ नदाफ आणि लोंढा वनपरिक्षेत्राचे आरएफओ तेज यांच्यासोबत संयुक्तपणे परिसराची पाहणी केली. हत्तींमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी बाधित शेतकऱ्यांना तातडीने योग्य भरपाई देण्याची आणि या हत्तींना पुन्हा जंगलात हाकलून लावण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी वन अधिकाऱ्यांकडे केली.

या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना अरविंद पाटील यांनी नागरिकांना शेतात किंवा कामावर जाताना विशेष काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Tags: