Belagavi

डॉ. डी. एन. मिसाळे यांची रेड क्रॉसच्या राज्य सल्लागारपदी नियुक्ती

Share

भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या राज्यस्तरीय प्रथमोपचार उपसमितीच्या सल्लागारपदी मारीहाळ डॉ. डी. एन. मिसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. मिसाळे यांनी यापूर्वी बेळगाव जिल्हा रेड क्रॉसचे सचिव आणि बी. के. पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सेवा बजावली आहे. सध्या ते बेळगाव वन्यजीव पर्यावरण विकास मंचाचे सरचिटणीस आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल माजी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि निवृत्त मुख्य वनसंरक्षक बी. व्ही. पाटील यांच्यासह मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे.

Tags: