भारतरत्न पद्मश्री नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्त जायंट्स मेन बेळगाव आणि जायंट्स सखी बेळगावच्या संयुक्त विद्यमाने के. एल. ई. डॉ. प्रभाकर कोरे रक्तपेढी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १५ जणांनी रक्तदान केले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी नाना चुडासमा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना जायंट्स मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले.


के. एल. ई. रक्तपेढीचे प्रमुख श्रीकांत विरगी यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी महिलांना आरोग्याबाबत जागरूक राहून समाजसेवेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. र
या शिबिरात बहुसंख्य पदाधिकारी, सदस्य आणि नागरिकांनी रक्तदान केले. या प्रसंगी विभागीय संचालक संजय पाटील, फेडरेशन संचालक सुनील मुतगेकर, अशोक हलगेकर आणि मदन बामणे उपस्थित होते.


Recent Comments