पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेच्या अंतर्गत येत्या १९ जून रोजी बेळगावमधील फाउंड्री क्लस्टर येथे राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हुबळीचे भविष्य निर्वाह निधी प्रादेशिक आयुक्त निरंजन गुप्ता यांनी दिली आहे.

बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आणि सामाजिक सुरक्षा योजनांविषयी जनजागृती करणे, तसेच मालक आणि लाभार्थी यांच्यात संवाद घडवून आणणे हा आहे. यासोबतच नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप आणि कामगार कल्याणाच्या विविध योजनांसह नवीन कामगार सुधारणांविषयी माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर उपस्थित राहणार असून सुमारे २०० जण सहभागी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेला सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त शुभम मीना, हुबळीचे अंमलबजावणी अधिकारी महेश जिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments