Chikkodi

शांतिगिरीमध्ये महामस्तकाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

Share

चिकोडी तालुक्यातील कोथळी-कुप्पानवाडी येथील जैन भाविकांचे प्रसिद्ध पुण्यक्षेत्र असलेल्या शांतिगिरीमध्ये मूळनायक १००८ शांतिनाथ, चंद्रप्रभू भगवान आणि महावीर भगवान यांच्या मूर्तींना अत्यंत भक्तीभावात आणि उत्साहात महामस्तकाभिषेक करण्यात आला.

सकाळी जैन मंदिरात महाशांतीधारा पूजा, धर्मध्वजारोहण आणि पंचामृत अभिषेक यांसह विविध धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर कोथळी गावापासून शांतिगिरीपर्यंत अश्व रथासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर आयोजित धर्मसभेत राष्ट्रसंत गुणधरनंदी मुनी आणि आचार्य शांतिसेन मुनी यांनी उपस्थितांना आशीर्वचन दिले.

तसेच नांदणीचे जिनसेन भट्टारक, कोल्हापूरचे लक्ष्मीसेन भट्टारक आणि चिंचणी सिद्धसंस्थान मठाचे शिवप्रसाद देव यांनीही भाविकांना मार्गदर्शन करत आशीर्वाद दिला.

पी. आर. पाटील, जयकुमार उपाध्ये, तात्यासाहेब पाटील, पासगौडा पाटील, संदीप पाटील आणि उपस्थित जैन भाविकांनी संयुक्तपणे दीपप्रज्वलन करून सभा कार्यक्रमाची सुरुवात केली.

या धार्मिक महोत्सवात श्री १०८ आचार्य रत्न देशभूषण दिगंबर जैन शांतिगिरी ट्रस्टचे (कोथळी-कुप्पानवाडी) अध्यक्ष पद्माकर पाटील, सचिव पासगौडा पाटील, वकील श्रीपाल मुन्नोळी, खजिनदार पायगौडा खोत, प्रमुख पदाधिकारी शाहू जैन, नितीन गांधी, किरण पाटील, कल्लाप्पा मगेंनवर, तात्यासाहेब पाटील, अण्णागौडा पाटील, बालगौडा पाटील, भाऊसाहेब पाटील, संदीप पाटील, तात्यासाहेब खोत, बाहुबली खोत यांच्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाभागातील जैन समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: