बेळगाव विभागाच्या हद्दीत येणाऱ्या विभिन्न विभागांतील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांच्या माध्यमातून केंद्रीय संरक्षण मंत्री आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना निवेदन सादर केले.


बेळगावमध्ये संरक्षण, आयकर, टपाल, लेखा, बीएसएनएल यांसारख्या विविध सरकारी विभागांमध्ये सध्या सुमारे ७ ते ८ हजार कर्मचारी कार्यरत असून जवळजवळ ५ हजार निवृत्त कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे बेळगावमधील रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना रोखविरहित उपचार पद्धती लागू करावी आणि आठवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करून या सुविधा द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत, हा विषय लवकरच केंद्रीय संरक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून योग्य व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले. या प्रसंगी संघटनेचे प्रमुख दिलीप हेगडे, सचिन पाटील, सतीश कलघटगी, महेश सुगंधी, गंगाधर पाटील, श्रीकांत पाटील यांच्यासह विविध विभागांचे केंद्र सरकारी कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments