हेल्मेट घालणे हे केवळ पोलिसांसाठी नसून ते तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या रक्षणासाठी आहे. बेळगाव शहरातील पीरनवाडी नाक्यावर आज खुद्द डीसीपी नारायण भरमणी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहनचालकांमध्ये जनजागृती केली.

पीरनवाडी नाक्यावर डीसीपी नारायण भरमणी यांच्या नेतृत्वाखाली दुचाकीस्वारांना वाहतूक नियमांचे पालन आणि कडक हेल्मेट सक्तीबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या. स्वतः रस्त्यावर उतरून वाहने थांबवत, डीसीपींनी नियम मोडणाऱ्यांना थेट दंड ठोकण्यापूर्वी प्रेमाने आणि समजुतीने सांगत ही अनोखी मोहीम राबवली. यावेळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते.

या मोहिमेदरम्यान बोलताना डीसीपी म्हणाले की, “हात किंवा पाय मोडला तर डॉक्टर दुरुस्त करू शकतात, पण डोक्याला मार लागला तर त्याला कोणतीही रिप्लेसमेंट नसते.” वाहन चालवण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी आठवावी, घरी तुमचे कुटुंब तुमची वाट पाहत असते. पोलिसांना पाहून हेल्मेट घालण्याऐवजी, अवघ्या ५००-६०० रुपयांचे हेल्मेट तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षा देते, त्यामुळे स्वतःच्या जिवासाठी हेल्मेट सक्तीने वापरा, असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments