मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने येत्या २२ जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘कन्नडसक्ती विरोधी मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी मंगळवार, १६ जून रोजी जांबोटी बाजारपेठ भागात जनजागृती फेरी काढत पत्रकांचे वाटप करण्यात आले.

कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या जनजागृती फेरीत माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बेळगावकर, जयराम देसाई, माजी सभापती मारुती परमेकर आणि खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई उपस्थित होते.

तसेच सरचिटणीस आबासाहेब दळवी, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, राजाराम देसाई, डी. एम. भोसले गुरुजी, विठ्ठलराव देसाई, रवींद्र शिंदे यांच्यासह विठ्ठल गुरव, राजू चिखलकर, शंकर सडेकर, प्रभाकर बिरजे, सुधीर पाटील, वसंत नावलकर, कृष्णा गावडे व हणमंत जगताप आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जांबोटी भागात पत्रक वाटप करत नागरिकांशी संवाद साधला.


Recent Comments