Belagavi

राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठात डॉ. दर्शिनी गोवेकर यांना सुवर्णपदक!

Share

कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्त असेल तर उच्च ध्येय गाठणे सहज शक्य होते, हे बेळगावच्या एका महिला डॉक्टरने सिद्ध करून दाखवले आहे. बंगळुरू येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेत बेळगावच्या डॉ. दर्शिनी गोवेकर यांनी सुवर्णपदक पटकावून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने आज मंगळवार, १६ जून २०२६ रोजी बंगळुरू येथे आयोजित पदवीप्रदान सोहळ्यात डॉ. दर्शिनी गोवेकर यांना ‘संहिता सिद्धांत’ या विषयात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वोच्च सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. डॉ. दर्शिनी या बेळगावमधील होनगा येथील डॉ. रवी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे साहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे त्यांच्या पालकांसह संपूर्ण बेळगाव जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल ‘रवी पाटील हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. रवी पाटील कॉलेजचे प्राचार्य, डीन तसेच डॉ. रवी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. दर्शिनी यांचे मनापासून अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: