बेळगाव तहसील कार्यालयात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वृद्ध आणि दिव्यांगांची पेन्शन जमा न झाल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आज पेन्शनची चौकशी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना कार्यालयात वीज नसल्यामुळे काम होणार नाही, असे सांगून परत पाठवण्यात आले. यामुळे लाभार्थ्यांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.

आज पहाटेपासूनच शेकडो वृद्ध नागरिक कार्यालयाबाहेर रांगेत उभे होते. मात्र, वीज पुरवठा खंडित असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम करण्यास असमर्थता दर्शवली. “अनेक महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही आणि आज वीज नसल्याने काम न करताच परत जावे लागत आहे,” अशी तक्रार लाभार्थ्यांनी केली.

दुसरीकडे, दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शनही रखडली आहे. त्यातच अधिकारी त्यांना वारंवार नवीन वैद्यकीय अहवाल सादर करण्यास सांगत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. रोजचे काम सोडून कार्यालयाचे फेरे मारावे लागत असल्याने दिव्यांग बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


Recent Comments