बेळगाव तालुक्यातील बोकनूर गावच्या हद्दीत असलेल्या सावगाव तलावाच्या काठावरील सार्वजनिक वनक्षेत्रातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २३,५०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई सोमवार, १५ जून रोजी करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी विजय श्रीनिवास नायडू (५४, गुडशेड रोड, बेळगाव), एकनाथ सदाशिव पावार (३७, अलतगा, बेळगाव), हारून मेहबूब मुल्ला (६०, वैभव नगर, बेळगाव), स्वप्नील उमाकांत हुंद्रे (३०, सरस्वती नगर, बेळगाव), कल्लाप्पा तम्मण्णा अष्टेकर (६२, तुरमुरी, बेळगाव), सुनील बाबू बुवा (४३, उचगाव, बेळगाव), बाळू सुब्बण्णा नाईक (४०, सोनारवाडी, कोल्हापूर) आणि अजय मधू मंडलिक (२३, बेनकनहळ्ळी, बेळगाव) यांना अटक केली आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टमणीगौडर आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.


Recent Comments