Belagavi

भारत विकास परिषद बेळगाव शाखेच्या अध्यक्षपदी विनायक मोरे

Share

भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षपदी विनायक मोरे यांची सलग तिसऱ्यांदा सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या गेल्या दोन वर्षांतील उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा ही जबाबदारी सोपवण्यात आली.

शाखेच्या मुख्य पदाधिकारी निवडीमध्ये के. वासुदेव प्रभू यांची सचिव म्हणून, तर डी. वाय. पाटील यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यासोबतच बेळगाव शाखेचे विनायक घोडेकर यांची कर्नाटक उत्तर प्रांताचे संघटन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नवनवीन कार्यकारिणीमध्ये प्राचार्य व्ही. एन. जोशी, डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, पांडुरंग नाईक, डॉ. जे. जी. कुलकर्णी, नामजी देशपांडे, सुहास गुर्जर, सुभाष मिराशी, सुहास सांगलीकर, व्ही. आर. गुडी, सीए श्रीनिवास शिवनगी, जयंत जोशी आणि स्वाती घोडेकर यांची कार्यकारी सल्लागार म्हणून निवड झाली आहे.

तसेच कार्यकारी मंडळात सचिन जवळी, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, अमर देसाई, रामचंद्र तिगडी, चंद्रशेखर इटी, माळतेश पाटील, कुबेर गणेशवाडी, नामदेव कोलेकर, पी. जे. घाडी यांचा समावेश आहे. महिला विभागाच्या प्रमुखपदी सुखदा देशपांडे यांची निवड करण्यात आली असून, समिती सदस्य म्हणून प्रा. अरुणा नाईक, जया नाईक, शुभांगी मिराशी, रजनी गुर्जर, विद्या इटी, लक्ष्मी तिगडी, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, उषा देशपांडे, उमा यलबुर्गी, रोहिणी पाटील, स्नेहा सांगलीकर, तृप्ती देसाई, अ‍ॅड. बना कौजलगी, अक्षता मोरे, ज्योती प्रभू, नंदिनी पाटील, ज्योत्स्ना गिलबिले आणि मंगला कुलकर्णी काम पाहणार आहेत.

भारत विकास परिषद ही एक राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आहे. बेळगाव शाखेतर्फे दरवर्षी दिव्यांगांना मदत, मोफत आरोग्य तपासणी, ग्रामविकास, राष्ट्रीय समूह गान स्पर्धा, ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषा, ‘गुरु वंदना’, गुणवंत विद्यार्थी सत्कार, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, १० वी व १२ वीच्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि मूल्यशिक्षण शिबिरे असे अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जातात.

Tags: