विजापूरमधील इंडी शहरात एका माजी सैनिकावर अज्ञात आरोपींनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात माजी सैनिक गंभीर जखमी झाले आहेत.

मारुती क्षत्री असे जखमी माजी सैनिकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, इंडी शहरात असणाऱ्या डीएसपी कार्यालयाजवळ मारुती क्षत्री यांचे मोबाईलचे दुकान असून या दुकानाजवळच अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर अचानक तलवारीने हल्ला केला. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून हत्येच्या उद्देशाने करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मारुती क्षत्री हे खाजगी कर्जपुरवठा देखील करत होते अशी माहिती समोर आली असून पोलीस या बाजूनेही तपास करत आहेत. मात्र, हल्ल्याचे मूळ कारण अद्याप निश्चित झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच इंडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. गंभीर जखमी झालेल्या मारुती क्षत्री यांना तातडीने उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी इंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.


Recent Comments