Belagavi

शिवानंद नीलण्णावरला अखेर जामीन

Share

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘शिवम असोसिएट्स’ मधील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावरला अखेर जामीन मिळाला असून काल रात्री त्याची कारागृहातून सुटका करण्यात आली.

बेंगळुरूच्या सिव्हिल आणि सेशन्स न्यायालयाने घातलेल्या कडक अटींच्या अधीन राहून आरोपीला अंतरिम जामीन मंजूर झाला असून, शिवानंद नीलण्णावरची हिंडलगा जेलमधून सुटका करण्यात आली आहे.

१५ मे रोजी बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी शिवानंद नीलण्णावर याला अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या नीलण्णावर याला बेंगळुरूच्या ९२ व्या सिटी सिव्हिल आणि सेशन्स न्यायालयाने १२ जून रोजी अंतरिम जामीन मंजूर केला. या आदेशानंतर कारागृहातून बाहेर आलेल्या नीलण्णावरने माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे न देता केवळ “ओम नमः शिवाय” म्हणत तेथून काढता पाय घेतला.

न्यायालयाने आरोपीला ३ लाख रुपयांचे हमीपत्र, देश सोडून न जाण्याची अट आणि २७ जून रोजी चौकशीसाठी अनिवार्यपणे हजर राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

Tags: