विजापूरमधील चडचण तालुक्यात टिप्पर आणि बाईकच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विजापूरमधील चडचण तालुक्यात असणाऱ्या मरगुर साखर कारखान्यासमोर मंगळवारी एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तेलंगणा पासिंगच्या एका टिप्परच्या चालकाने वाहन चुकीच्या बाजूने चालवून एका बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात बाईकस्वार धर्मण्णा होसमनी आणि बिराप्पा पूजारी हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. हे दोघेही विजापूरमधील इंडी तालुक्यात असणाऱ्या गोरनाळ गावचे रहिवासी होते.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सोमय्या हिरेमठ यांना उपचारासाठी विजापूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून याप्रणी झळकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments