Belagavi

मंत्री जारकीहोळींवरील टिप्पणीविरोधात दलित नेत्यांचा संताप

Share

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात सोशल मीडियावर अवमानकारक व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या मल्लिकार्जुन राशिंगे याच्याविरोधात बेळगावमधील दलित नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना दलित नेते मल्लेष चौगुले म्हणाले, “मल्लिकार्जुन राशिंगे हा स्वयंघोषित नेता असून त्याचे समाजासाठी शून्य योगदान आहे. चलवादी समाजाचा नेता असल्याचा दावा करणाऱ्या राशिंगेने यापूर्वी अनेक अधिकारी आणि जनतेशी गैरवर्तन केले आहे. मंत्री सतीश जारकीहोळी हे कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नसून ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील ‘अहिंदा’चे नेते आहेत. त्यांचा वाढता आलेख सहन न झाल्यानेच राशिंगेने हे कृत्य केले आहे.”

महावीर मोहिते यांनी सांगितले की, राशिंगेने यापूर्वीही अशी बेजबाबदार वक्तव्ये केली आहेत. काल जाहीर झालेल्या व्हिडिओमध्ये मंत्र्यांचा थेट अवमान करण्यात आला आहे. राज्य आणि देश पातळीवर पुढे येणाऱ्या दलित नेतृत्वाला बदनाम करण्याचा हा पद्धतशीर कट असून, राशिंगेवर तातडीने कडक कारवाई करून त्याची हकालपट्टी करण्यात यावी.

Tags: