बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जनजागृती दिन’ यशस्वीपणे साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना महानगरपालिकेचे उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी ज्येष्ठांना आधुनिक तंत्रज्ञान शिकून ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या सायबर फसवणुकीपासून दूर राहण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि इतर विविध सरकारी विभाग तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश के. एन. शिवकुमार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विशेष व्याख्यान देताना मनपा उपायुक्त उदयकुमार बी. तळवार यांनी कुटुंब सांभाळण्यातील ज्येष्ठांच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले की, सध्या वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांचा फटका बसू नये आणि आयुष्यभराची कष्टाची कमाई सुरक्षित राहावी, यासाठी ज्येष्ठांनी डिजिटल गोष्टींची माहिती करून घेणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाला महादेव बिलकर, सुशीला राजपूत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments