बेळगाव ग्रामीण मतदारसंघात पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विविध गावांचा दौरा करून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले.


यामध्ये बडस ते बिदरगड्डी दरम्यान १.१२ कोटी रुपयांचा रस्ता, बेंडिगेरी गावातील १.०५ कोटी रुपयांचे रस्ते व गटार बांधकाम, आणि बसरिकट्टी-माविनकट्टी-होन्नीहाळ गावांना जोडणाऱ्या ५० लाख रुपयांच्या पुलाच्या कामाचा समावेश आहे.


या दौऱ्यात त्यांनी अरळीकट्टी येथील श्री बसवेश्वर मंदिर बांधकामासाठी २० लाख रुपयांचा तिसऱ्या हप्त्याचा धनादेश सुपूर्द केला. सर्व विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी कंत्राटदारांना दिले असून, आपला मतदारसंघ राज्यात आदर्श बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या वेळी स्पष्ट केले.


Recent Comments