Belagavi

प्राचार्य मल्लिकार्जुन हिरेमठ यांना पीएच.डी. पदवी प्रदान.

Share

बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाने मुधोळ येथील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य मल्लिकार्जुन एम. हिरेमठ यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.

सांस्कृतिक विषयावरील उत्कृष्ट संशोधन प्रबंधासाठी हा उच्च बहुमान मिळाला असून शैक्षणिक वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे.

मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कन्नड विभागाला ‘मंन्टेस्वामी आणि प्रमुख वचनकार: एक सांस्कृतिक संघर्ष’ हा शोधप्रबंध सादर केला होता. या संशोधनासाठी त्यांना विद्यापीठाच्या कन्नड भाषा अध्ययन संस्थेचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पी. नागराज यांचे मार्गदर्शन लाभले. हिरेमठ हे सध्या मुधोळ येथील दानम्मादेवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

Tags: