भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे (KSCA) अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांचे आज बेळगावमध्ये आगमन झाले. केएससीएच्या वतीने आयोजित महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या व्यंकटेश प्रसाद यांचे बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी विमानतळावर मनःपूर्वक स्वागत केले.

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या विशेष पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्यासाठी बेळगावमधील सांबरा विमानतळावर पोहोचलेल्या या माजी स्टार क्रिकेटपटूचे आमदार अभय पाटील यांनी अत्यंत आदराने स्वागत केले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिग्गज खेळाडूचा हा दौरा बेळगाव शहरासाठी अभिमानास्पद असून यामुळे सीमावर्ती जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवीन प्रेरणा मिळेल, असा विश्वास आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला. बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात क्रिकेट क्षेत्राची आणखी प्रगती व्हावी आणि केएससीएच्या वतीने होणारे क्रीडा कार्यक्रम यशस्वी व्हावेत, अशा शुभेच्छा या वेळी देण्यात आल्या.



Recent Comments