Belagavi

बेळगावमधील जैन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राष्ट्रीय कार्यशाळेचा प्रारंभ

Share

बेळगावमधील नामांकित जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन ‘नॉलेज एन्हांसमेंट प्रोग्राम २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.

या सत्राचे उद्घाटन आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह काकासाहेब देसाई यांच्या हस्ते झाले. भविष्यकालीन आव्हाने आणि सुस्थिर विकासासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे डॉ. प्रतापसिंह काकासाहेब देसाई यांनी म्हटले. तसेच बदलत्या औद्योगिक गरजांनुसार इंजिनिअरिंग शिक्षकांनी आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवावे, असा सूर कार्यकारी समितीचे सदस्य इंजिनिअर सुरेश रायमाने आणि इंजिनिअर पंकज रायमाने यांनी लावला.

भारतातील शेकडो प्राध्यापक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक या ऑनलाईन कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले आहेत. १३ जूनपर्यंत चालणाऱ्या या तांत्रिक सत्रांमध्ये स्मार्ट सिटी, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणीय सुस्थिरता आणि बांधकाम व्यवस्थापनात एआय तंत्रज्ञानाच्या आधुनिक वापराबाबत माहिती दिली जात आहे.

Tags: