Belagavi

बेळगावमध्ये पर्यावरण आणि आरोग्यासाठी भव्य सायकल रॅली

Share

बेळगावमध्ये पर्यावरण आणि आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी एका भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘अस्मिता सायकल लीग’च्या वतीने आयोजित या रॅलीला सायकलप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला .

जागतिक सायकल दिनानिमित्त बेळगावमध्ये ‘अस्मिता सायकल लीग’च्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. माजी आमदार विवेकराव पाटील, अनिल पोतदार आणि डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांनी या रॅलीचा शुभारंभ केला. . या रॅलीत १०० हून अधिक महिलांसह ३०० हून अधिक सायकलप्रेमी उत्साहाने सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू केला, त्याच धर्तीवर जागतिक सायकल दिन साजरा केला जात आहे. या रॅलीला सायकलप्रेमींकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून १०० हून अधिक महिलांनी उत्साहाने भाग घेतला आहे. याद्वारे नागरिकांमध्ये सायकल चालवण्याबाबत जनजागृती केली जात असल्याचे माजी आमदार विवेकराव पाटील यांनी म्हटले.

स्थानिक खेळाडू आणि सायकलप्रेमींनी ऑलिम्पिकसह जागतिक पातळीवरील मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, यासाठी आवश्यक ते सर्व प्रोत्साहन आणि सहकार्य दिले जात असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. बेळगावमधील रस्त्यांवरून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत निघालेल्या या सायकल रॅलीचे नागरिकांनी कौतुक केले.

Tags: