बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सीमाप्रश्नावर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बेळगाव हा कर्नाटकचाच अविभाज्य भाग असल्याचा दावा करत त्यांनी मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेट्टर यांच्या या विधानामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना जगदीश शेट्टर यांनी सीमाप्रश्नाबाबत वादग्रस्त विधाने केली. बेळगाव कर्नाटकचा भाग असून यावर महाजन अहवाल अंतिम असल्याचा दावा त्यांनी केला. बेळगावमध्ये दोन्ही भाषिक बंधूभावाने राहत असल्याचे सांगत, शहराच्या विकासासाठी कर्नाटकच्या बाजूने ठराव मंजूर करण्याबाबत आपण महापौरांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा कोणताही प्रश्न येत नसल्याचे सांगत शेट्टर यांनी सीमाप्रश्नावर केवळ सारवासारव केली आहे.



Recent Comments