पत्रकारिता छायाचित्रण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेळगावचे ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार पी. के. बडिगेर यांच्यासह राज्यातील प्रमुख छायाचित्रकारांचा बेंगळुरू येथे गौरव करण्यात आला.


बेंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय फोटो आणि व्हिडिओ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी कर्नाटक व्हिडिओ आणि फोटो असोसिएशनतर्फे आयोजित या आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे उद्घाटन एमएसएमई अधिकारी देवराज के., असोसिएशनचे अध्यक्ष एच. व्ही. कृष्णप्पा आणि सचिव ए. जगदीश यांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकारिता छायाचित्रण क्षेत्रातील योगदानाबद्दल बेळगावचे पी. के. बडिगेर, बेंगळुरूच्या पूर्णिमा, विश्वेश्वरप्पा एस., कोप्पळचे नागराज दस्तानावर, बळ्ळारीचे रुद्रस्वामी, बेंगळुरूचे अक्रम आणि म्हैसूरचे प्रगती गोपाळकृष्ण यांच्यासह एकूण ८० जणांना ‘छायारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी देवराज के. यांनी छायाचित्रकारांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तर बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगत, छायाचित्रकारांच्या हितासाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी एच. व्ही. कृष्णप्पा यांनी केली. या कार्यक्रमाला संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments