बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त कामाच्या दडपणामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) पर्यवेक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी महापौर प्रीती कामकर यांना निवेदन दिले.


बेळगाव महापालिकेचे महसूल कर्मचारी सध्या मालमत्ता कर वसुली, जनगणना, पार्किंग व्यवस्थापन, बॅनर हटवणे आणि मदत केंद्रांचे पर्यवेक्षण यांसारख्या मूळ कर्तव्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यातच एसआयआरची कामे सुरू झाल्याने कामाचा ताण आणखी वाढला आहे. या व्यस्ततेत बीएलओ पर्यवेक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी दिल्याने मूळ कामे करण्यास वेळ मिळत नसून वरिष्ठांच्या दबावामुळे कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या अतिरिक्त कार्यभारातून मुक्तता करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


या प्रसंगी महसूल विभागाचे प्रमुख यल्लेश बच्चलपुरी, सागर कांबळे, बी. एस. कोलकार, पी. आर. पाटील, एल. सी. कलपत्री, पी. एस. नाईक, पी. ओ. हलगेकर, बी. पी. हुवन्नवर, जी. ए. पालकर, एस. बी. ओसी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments