Belagavi

बेळगावात विश्व बालकामगार विरोधी दिन; विविध विभागांच्या समन्वयानेच निर्मूलन शक्य

Share

बेळगाव जिल्हा प्रशासन आणि कामगार विभागातर्फे कुमार गंधर्व कला मंदिरात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कामगार विभाग आणि महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘विश्व बालकामगार विरोधी दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात न्यायाधीश के. एन. शिवकुमार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावे बोलताना त्यांनी बालकामगार पद्धतीचे शंभर टक्के निर्मूलन करण्यासाठी केवळ कायदा पुरेसा नसून सर्व शासकीय विभागांमध्ये योग्य समन्वय असणे आणि संबंधित कुटुंबांचे पुनर्वसन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. “बालकामगारांना रेड कार्ड – मुलांना न्याय्य बालपण, प्रौढांना सन्मानाचा रोजगार” या घोषणेसह राबवण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात बोलताना, त्यांनी गेल्या ४० वर्षांपासून कायदा असूनही आजही जनजागृती करावी लागत असल्याबद्दल खंत व्यक्त केली; तसेच या कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला उप कामगार आयुक्त नागेश डी. जी., सहाय्यक कामगार आयुक्त नागराज के. बी. आणि बालकामगार प्रकल्प संघटनेच्या संचालिका ज्योती कांते यांच्यासह कामगार विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags: