प्रभाग क्रमांक २७ मधील बऱ्याच दिवसांपासून बंद असलेले बोरवेल अखेर आज दुरुस्त करून सुरू करण्यात आले. गल्लीतील लहान मुलांनी बोरवेलमध्ये दगड टाकल्यामुळे मोटर अडकून पाणीपुरवठा खंडित झाला होता.

बोरवेलमधील अडकलेली मोटर काढण्यासाठी एल अँड टी कंपनीने मोठे प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. यानंतर स्थानिक नगरसेवकांनी तातडीने पुढाकार घेत स्वतःच्या खर्चाने एका खाजगी कंपनीला पाचारण केले. या खाजगी कंपनीच्या माध्यमातून बोरवेलमध्ये अडकलेले पाईप आणि केबल यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. यानंतर एल अँड टी कंपनीकडून त्यामध्ये नवीन मोटर बसवण्यात आली असून आजपासून हे बोरवेल पुन्हा कार्यान्वित झाले आहे. या वेळी गल्लीतील नागरिक आणि एल अँड टी कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरवेल सुरू झाल्याच्या प्रसंगी संजय पाटील, पिंटू पोटे, गजानन मेणसे आणि बाळू कंग्राळकर प्रामुख्याने उपस्थित होते.



Recent Comments