Chikkodi

चिक्कोडीमध्ये तंबाखू मुक्तीसाठी प्रबोधन रॅली

Share

चिक्कोडीमध्ये के.एल.ई. आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुका विधी सेवा समिती आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन व भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी ७ वे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विजयकुमार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. खणदाळे आणि प्राचार्य डॉ. किरणकुमार मुत्नाळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पोलीस उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली , डॉ. श्वेता पाटील यांचयसह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चिक्कोडीचे सहाय्यक आयुक्त सुभाष संपगावी, न्यायाधीश अरुणकुमार , के.एल.ई. आयुर्वेद आणि नर्सिंग कॉलेजचे व्याख्याते, प्रमुख अधिकारी, डॉक्टर, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: