बेळगावमधील खासबाग येथील श्री साईराम मंदिरात १,००० आंब्यांची विशेष आरास करून पूजा करण्यात आली.


सायंकाळच्या आरतीनंतर सजावटीसाठी वापरलेले आंबे भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आले. महेश वेर्णेकर यांच्या नेतृत्वाखालील मंदिर व्यवस्थापन समितीने दर्शनाची व्यवस्था केली होती. मंदिरात दररोज चार वेळा नियमित पूजा आणि आरती होते, अशी माहिती मंदिराचे सचिव श्रीधर तिगडी यांनी दिली.

खासबाग येथील राघवेंद्र कॉलनीतील श्री साईराम मंदिरात या विशेष पूजेमुळे मंदिर परिसर भक्तीमय झाला होता. या पूजेनिमित्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.


Recent Comments