बेळगावमधील सरदार हायस्कूलच्या आवारात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी नाविन्यपूर्ण ‘चेस पार्क’ उभारले जात आहे. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासमवेत आमदार आसीफ सेठ यांनी या कामाची पाहणी केली.


विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढावी आणि धोरणात्मक निर्णय घेण्याचे कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने या ‘चेस पार्क’चे नियोजन करण्यात आले आहे. हे केवळ मनोरंजनाचे ठिकाण नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी पोषक वातावरण निर्माण करेल, असा विश्वास आसीफ सेठ यांनी व्यक्त केला. काम लवकरात लवकर पूर्ण करून ते विद्यार्थ्यांच्या वापरासाठी खुले करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या पाहणीनंतर आमदार आसीफ सेठ यांनी सरदार सरकारी पीयू कॉलेजला भेट देऊन नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी, “शिक्षण हे समाजाच्या सक्षमीकरणाचे सर्वात प्रभावी साधन आहे. आपल्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घ्यावेत,” असे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयीन कर्मचारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.




Recent Comments