विश्वकर्मा विद्यावर्धक संघाच्या वतीने बेळगाव मधील काळी आमराई येथील सभागृहात होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसह शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.


समाजाकडून मिळणाऱ्या मदतीचा सदुपयोग करून गरीब विद्यार्थ्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण करावे आणि भविष्यात इतरांना मदत करावी, असे आवाहन हेस्कॉम शहर विभागाचे नूतन कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर यांनी केले.


संघाचे अध्यक्ष प्रभाकर बडीगेर यांनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने अधिक मासानिमित्त सामूहिक विष्णू सहस्रनाम आणि ललिता सहस्रनाम पठण तसेच ओटी भरणे हा कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी व्यासपीठावर राजीव पंडित, दत्ता आंबेवाडीकर, मौनेश देशनूर, प्रदीप पत्तार, मोहन बडीगेर, एम.के. बडीगेर, मुरली सुतार, छायाचित्रकार पी.के. बडीगेर आणि पत्रकार डी.व्ही. कम्मार उपस्थित होते. जी.एस. सोनार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रामकृष्ण बडीगेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर गोपाळ पांचाळ यांनी आभार मानले.


Recent Comments