Belagavi

बेळगावमध्ये १२ जूनला शहापूर महालक्ष्मी देवीचा ११४ वा जन्मोत्सव

Share

बेळगावमधील शहापूरचे आराध्य दैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवी मंदिरात शुक्रवार, १२ जून रोजी ११४ वा जन्मोत्सव आणि जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे.

या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी शहापूर आणि परिसरातील सर्व नागरिक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: