Belagavi

बेळगाव मधील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत एआय (AI) आणि कोडिंग पुस्तकांचे वाटप

Share

भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन, बेळगाव मधील रामतीर्थ नगर येथील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत एआय (AI) आणि कोडिंगच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. चाणक्य शिक्षण आणि समाज कल्याण संस्थेच्या पुढाकाराने या डिजिटल साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक डॉ. राजशेखर, शिक्षकवृंद आणि चाणक्य शिक्षण व समाज कल्याण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष नागराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मल्लेश चौगले, लिंगराज पाटील, चेतन हिरेमठ आणि अनिता असुकर यांच्यासह अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले होते.

यावेळी दत्तमंश एडटेक संस्थेच्या रेखा गुरवगोळ यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांचा वापर कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन केले. सरकारी शाळेतील मुलांना डिजिटल युगासाठी सक्षम करण्याच्या या निर्णयाचे शाळेच्या व्यवस्थापन समितीने स्वागत केले असून, संस्थेच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Tags: