Belagavi

तीन मुलींना जन्म दिल्याने विवाहितेचा छळ; बेळगाव मध्ये पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Share

तीन मुलींना जन्म दिल्याच्या कारणावरून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध बेळगाव महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

बेळगाव मधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या सुमन प्रसाद वाकुडे हिचा विवाह २०२१ मध्ये झाला होता. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये जुळ्या मुलींना आणि डिसेंबर २०२४ मध्ये तिसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर पतीचे अत्याचार वाढले. पत्नीला त्रास देऊन पती वारंवार मारहाण करत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

पतीसोबतच सासरा नारायण, सासू व नातेवाईकांनी पतीला दुसऱ्या लग्नासाठी प्रवृत्त करून सुमनला घटस्फोटासाठी दबाव टाकला. जुलै २०२५ मध्ये पती पत्नी आणि मुलांना माहेरी सोडून निघून गेला आणि घरखर्चासाठी कोणतीही मदत केली नाही. याआधी समुपदेशनाचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने, आता कायद्याचा आधार घेत पीडितेने या पाच जणांविरुद्ध तक्रार नोंदविल्याची माहिती संबंधित पीडित महिलेने दिली आहे.

Tags: