Belagavi

सोगलमध्ये धबधब्यांचा विलोभनीय आविष्कार

Share

मान्सून पूर्व पावसाच्या आगमनानंतर सोगल येथील ऐतिहासिक तीर्थस्थळी निसर्गाचा विलोभनीय आविष्कार पाहायला मिळत आहे. पावसाच्या आगमनामुळे येथील धबधब्यांनी नयनरम्य स्वरूप धारण केले आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून, सोगल येथील डोंगररांगांमधून वाहणारे पाणी धबधब्याच्या स्वरूपात वाहून येत आहे. डोंगरावरून कोसळणारे फेसाळणारे धबधबे पाहून भाविक आणि पर्यटकांना निसर्गाच्या या बहरलेल्या रूपाचा अनुभव मिळत आहे. या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने तिथे भेट देत आहेत.

श्री सोगल सोमेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हे दृश्य पर्वणी ठरत असून, प्रत्येकजण निसर्गाच्या या सोहळ्यात तल्लीन झाला आहे. अनेक पर्यटक आपल्या मोबाईलमध्ये या निसर्गसौंदर्याचे व्हिडिओ आणि फोटो टिपून आनंद व्यक्त करत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी असलेला धबधबा प्रवाहित झाला असून तीर्थस्थळाला आता पर्यटन स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे…..

Tags: