बेळगावमधील जेएनएमसी परिसरामध्ये केएलई संस्थेच्या वतीने आयोजित ‘वचनोत्सव-२०२६’ कार्यक्रमात हजारो कंठांमधून उमटलेल्या वचन गायनाने उपस्थितांना भक्तीरसात मंत्रमुग्ध केले.


बेळगावमधील केएलई युनिव्हर्सिटी आवारात कन्नड बळग व संगीत महाविद्यालयाच्या वतीने ‘वचनोत्सव-२०२६’ चे आयोजन डॉ. बसव मरुळसिद्ध स्वामीजींच्या सान्निध्यात करण्यात आले होते. या सोहळ्यात ५ वर्षांच्या बालकांपासून ८५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांनी सामूहिक वचन गायन सादर केले.


या वेळी बोलताना केएलई संस्थेचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांनी, १२ व्या शतकात ‘अनुभव मंटप’ द्वारे महिला-पुरुषांना समान हक्क देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या दूरदृष्टीचा गौरव केला. वचनांचे संदेश आजही अत्यंत समर्पक असल्याची प्रतिक्रिया डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली.


Recent Comments