माजी मंत्री जमीर अहमद यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे या मागणीसाठी हुबळीमधील इंडीपंप चौकात अंजुमन संस्था आणि काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

अंजुमन संस्थेचे अध्यक्ष ए. एम. हिंडसगेरी आणि हुबळी-धारवाड शहर काँग्रेस अध्यक्ष अल्ताफ हल्लूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येत माजी मंत्री जमीर अहमद यांना मंत्रिपद देण्याची जोरदार मागणी केली.

आंदोलकांनी जमीर अहमद यांचे फलक हाती घेऊन मुस्लिम समाजावर अन्याय होत असल्याच्या घोषणा दिल्या. जमीर अहमद यांनी यापूर्वी उत्तम काम केले असल्याने त्यांना पुन्हा एकदा मंत्री करण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली.


Recent Comments