कागवाड मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या मातोश्री पार्वती बाळासाहेब पाटील (वय ९४) यांचे आज, शनिवारी सकाळी निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच कागवाड मतदारसंघातील ‘चिंचली’ या गावी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक राजकीय नेते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून श्रीमंत पाटील व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले आणि दुःखामध्ये सहभाग दर्शवला.

रक्षा विसर्जन येत्या सोमवार दिनांक ८ रोजी करण्यात येणार आहे.


Recent Comments