बेळगाव तालुक्यातील सुळगा उचगाव येथील सरकारी मराठी मुला-मुलींच्या शाळेत राजश्री अॅग्रीव्हेंचर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने एकूण २३० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

बेळगाव जवळील सुळगा उचगाव येथील सरकारी मराठी मुला-मुलींच्या शाळेत राजश्री अॅग्रीव्हेंचर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील २३० विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजश्री अॅग्रीव्हेंचर संस्थेच्या वतीने देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी संस्थेच्या संस्थापकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, अॅडव्होकेट प्रशांत पवार, प्रदीप सुतार यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक ओ. एन. मादार, एम. आर. कोवाडकर, एच. एन. पावले, शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एन. मुतगेकर यांनी केले.


Recent Comments