बेळगावमधील केएलएस गोगटे तंत्रज्ञान महाविद्यालयात (जीआयटी) आयोजित योगासन स्पर्धा २०२६ चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बेळगावमधील केएलएस गोगटे तंत्रज्ञान महाविद्यालयात पार पडलेल्या योगासन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अथवणे आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. विविध वयोगटात झालेल्या या स्पर्धेत सुमारे ८५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५०० आणि १००० रुपयांचे रोख बक्षीस, करंडक तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यांना पदके प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेत शरण्या गायद, श्रेयस करबन्नी, स्फूर्ती बदवन्नी, प्रितम वाघूकर, कृष्णाली के., भरत गौडा, मंजुळा गौडर आणि विवेक तिवारी यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. जीआयटी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातील कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.


Recent Comments