राज्यात मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तारावरून असंतोष उफाळून आला आहे. हुबळी पूर्व मतदारसंघाचे आमदार प्रसाद अब्बय्या यांना मंत्रिपद देण्यात यावे, या मागणीसाठी हुबळीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी तीव्र आंदोलन केले आहे.

आमदार प्रसाद अब्बय्या हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले असून, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायलाच हवे, अशी आग्रही मागणी काँग्रेस कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांकडून केली जात आहे. प्रसाद अब्बय्या यांना मंत्रिपद न दिल्यास आगामी काळात हुबळी-धारवाड बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आज शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या दुर्गद बैल भागात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून प्रशासनाचा आणि पक्षाचा तीव्र निषेध केला.



Recent Comments