आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर हुबळीमध्ये क्रिकेट चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. मध्यरात्री चाहत्यांनी शहरातील चन्नम्मा चौकात एकत्र येत घोषणाबाजी केली.

आरसीबी संघाने विजय मिळवताच हुबळी शहरात ठिकठिकाणी जल्लोष सुरू झाला. सामन्याच्या अंतिम क्षणात विराट कोहलीने षटकार ठोकून संघाचा विजय निश्चित करताच क्रिकेट चाहते गोळा झाले.

यावेळी चाहत्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून आरसीबीच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. चन्नम्मा चौक आणि संगोळी रायण्णा चौक परिसरात चाहत्यांनी एकत्र येत एकमेकांना मिठाई वाटून या विजयाचा आनंद साजरा केला.


Recent Comments