Belagavi

हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई; ५ दुचाकींसह अट्टल चोरट्याला ठोकल्या बेड्या

Share

बेळगाव शहर आणि परिसरात दुचाकी चोऱ्या करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला अटक करण्यात हिरेबागेवाडी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी जप्त केल्या आहेत.

बेळगाव पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. गोकाक तालुक्यातील अडीवेप्पन अंकलगी येथील रहिवासी असलेला लक्ष्मण विरूपाक्षी कणबर्गी (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण भरमणी, निरंजन राजे अरस आणि एसीपी बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर एस. के. होळेंनवर, पीएसआय बी. के. मिटगार, अविनाश यरगोप्प आणि सहकाऱ्यांनी १ जून रोजी ही मोहीम राबवून आरोपीला अटक केली. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामगिरीबद्दल पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Tags: