Belagavi

बेकायदेशीर घातक हत्यारांसह एकाला अटक

Share

बेळगावमधील टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी कारवाई करत सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे घातक हत्यारे बाळगल्याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. आरपीडी क्रॉस जवळ संशयास्पद रित्या फिरत असताना ही कारवाई करण्यात आली.

महाद्वार रोड येथील रहिवासी वैभव महादेव पोठे (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरपीडी क्रॉस जवळील सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे लोखंडी चाकू आणि लोखंडी पंच बाळगल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पूजेरी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध टिळकवाडी पोलिस ठाण्यात आर्म्स ॲक्ट आणि के.पी. ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केल्याबद्दल बेळगाव शहर पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांनी संबंधित पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Tags: